loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाणे शहरात कोंडी फोडण्यासाठी लवकरच प्रायोगिक तत्वावर अधिसूचना

ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे शहराची वाढती लोकसंख्या आणि वाहनांचा विचार करता घोडबंदरपासून वर्तकनगर आणि स्टेशन परिसरात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिका, वाहतूक शाखा आणि आरटीओच्या समन्वयातून काही निर्णय घेण्यात आले असून आवश्यक वाहतूक बदलांसाठी लवकरच प्रायोगिक तत्वावर अधिसूचना काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. ठाणे शहरातील वाढत्या वाहतूक समस्या आणि नियमित होणारी वाहतूक कोंडी यावर उपाययोजना करण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी तीन हात नाका येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात वाहतूक शाखा, महापालिका, आरटीओ आणि नागरिकांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेतली. यावेळी झालेल्या निर्णयांची माहिती केळकर यांनी समाजमाध्यमांना दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शहरातील घोडबंदर, स्टेशन परिसर, वर्तकनगर, मध्यवर्ती ठाणे आदी विभागात वाढती लोकसंख्या आणि वाहने यामुळे नियमित वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागते. अवजड वाहने, खासगी बसगाड्या, मीटर आणि शेअर रिक्षा यांची अनधिकृतपणे होणारी वाहतूक, बेकायदेशीर पार्किंग फेरीवाल्यांचे अतिक्रमण यामुळे शहरात विशेषतः घोडबंदर आणि स्टेशन परिसरात वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

टाइम्स स्पेशल

वाहतूक नियंत्रण परिपूर्ण व्हावे यासाठी शहरात दोन हजार सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी वाहतूक शाखेचे मनुष्यबळ कमी पडत असेल तर पुढील अधिवेशनात त्याबाबत मागणी करण्यात येईल, असे,केळकर यांनी सांगितले. यावेळी वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाठ, आरटीओचे अधिकारी गोसावी, नौपाडा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त महेश पाटील, सहाय्यक आयुक्त श्रीमती भोईर, ढोले तसेच नागरिकांच्या वतीने काही प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg