देवरूख (सुरेश सप्रे) - शिवसेनेत फुट पडल्याने गत ३३ वर्षे पंचायत समितीवर सत्ताधारी असलेल्या उबाठासेनेला पायउतार करण्यात महायुतीला यश आले आहे. आता सभापती पदावर कोण विराजमान होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. यावेळच्या निवडणूकीत अनेक प्रस्थापित राजकारण्यांना मतदारांनी चांगलाच धोबीपछाड देत घरी बसवले. यात माजी आमदार सुभाष बने व माजी जिप अध्यक्ष व सपंर्क प्रमुख राजू महाडीक. माजी सभापती जया माने. सहदेव बेटकर यांचे राजकीय भविष्य अंधःकारमय झाले आहे. यात धामापूर तर्फे संगमेश्वर जिप गटात उबाठा कडून सहदेव बेटकर हे पुन्हा घरवापसी करत रिंगणात होते. त्यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुशिल भायजे यांनी पराभव केला. उबाठा सेनेचा बालेकिल्ला समजला जाणारा कडवई गटात तिरंगी लढतीत उबाठाचे आक्रमक नेतृत्व असलेले माजी जि.प. उपाध्यक्ष संतोष थेराडे यांनी भाजपाचे तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के यांना धोबीपछाड दिला. कसबा संगमेश्वर गट हा १९९२ पासून राजू महाडीक यांचा बालेकिल्ला असून त्याच्या पत्नी व माजी जिप अध्यक्ष रचना महाडीक या शिवसेनाकडुन रिंगणात होत्या. त्यांना थेट लढतीत नवख्या असलेल्या उबाठाच्या विशाखा कुवळेकर यांनी धुळ चारली. एकतर्फी वाटणाऱ्या या लढतीत उबाठासेनेची असलेली ताकद तसेच कुणबी व मुस्लिम फॅक्टर यामुळे १९९२ पासूनचा महाडीक यांचा अभेद्य असलेल्या गडाला सुरुंग लावून करिश्मा केला. मुचरी गटात महायुतीकडून माजी जिप सदस्या माधवी गीते यांनी राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या नवख्यापण उच्च शिक्षित व अन्यायाविरुद्ध आक्रमकपणे लढणाऱ्या अशी ओळख निर्माण केलेल्या उबाठासेनेच्या ललीता तांबे याचा पराभव केला. तालुक्यातील अंत्यत प्रतिष्ठेची ठरलेली कोसुंब गटातीत मैत्रीपूर्ण लढतीत भाजपाच्या प्रमोद अधटराव यांनी माजी जिप अध्यक्ष रोहन बने यांचा दारूण पराभव करत मागिल पराभवाचा उट्टा काढत आपले वर्चस्व सिद्ध केले.
साडवली गटात भाजपकडून माजी जिप अध्यक्ष रश्मी कदम यांच्या सुनबाई असून भाजपाचे तालुकाध्यक्ष रूपेश कदम यांच्या पत्नी रुपाली कदम यांची कडवी झुंज अपयशी ठरलेने उबाठा सेनेच्या माजी मंत्री रवींद्र माने याच्या पत्नी जि.प. सदस्या नेहा माने या विजयी झाल्या. दाभोळे गटात माजी जि.प. सदस्य व महायुतीचे विलास चाळके यांनी वंचित बहुजन आघाडीच्या नवख्या असलेल्या विरश्री बेटकर यांचा पराभव केला. धामापूर गणात उबाठाचे अजय चव्हाण यांना भाजपाचे महेश जड्यार यांनी पराभव केला. आरवली गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार विजयी तर कडवई गणात उबाठाच्या अपर्णा जाधव यांनी शिवसेनेच्या सुचिता कदम यांचा पराभव केला. धामणी गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष भडवळकर व उबाठाचे दत्ताराम लाखण या चुरशीच्या लढतीत लाखण हे विजयी झाले. कसबा गणात उबाठाचे चंद्रकांत फणसे यांचेवर शिवसेनेचे सुरेश माईन यांनी निसटता विजय मिळविला. तर परचरी गणातून शिवसेनच्या शर्वरी वेल्ये यांना उबाठाच्या पुजा शितप यांचा पराभव केला आहे. माभळे गणात भाजपातून उबाठात प्रवेश केलेल्या दिलिप गीते यांचा शिवसेनाच्या सुहास मायंगडे यांनी पराभूत केले. मुचरी गणात उबाठाच्या प्रज्ञा गमरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आरूची घवाळी यांनी पराभव केला. कोसुंब गणात उबाठाकडून सुहासिनी भाताडे यांना भाजपाच्या दूर्वा पाष्टे यांनी एकतर्फी लढतीत मात दीली. निवे गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल बाईत यांनी ही एकतर्फी लढतीत उबाठाचे सुरेश गुरव यांना धोबीपछाड दीला.
साडवली गणात पालकमंत्री उदय सामंत यांचे निकटवर्ती शिवसेनेचा आक्रमक चेहरा असलेले सचिन मांगले यांच्या पत्नी तृप्ती मांगले यांची कडवी लढत अपयशी ठरलेने उबाठाचे युवासेनेचे नेते व माजी सभापती छोट्या गवाणकर यांच्या पत्नी क्षमा जाधव यांनी अखेरचा क्षणी विजय मिळविला. हातीव गणात आम. निकम यांचे निकटवर्तीय मंगेश बांडागळे यांनी उबाठा शिवसेनेचे प्रदिप ढवळ यांचे कडवे आव्हान परतवून लावत विजय प्राप्त केला. कोंडगाव गणातील प्रतिष्ठेच्या लढतीत आम. कीरण सामंत यांचे निकटवर्तीय मानले जाणारे माजी सभापती जयसिंग (जया) माने यांचा उबाठाचे तरुण तडफदार विद्यासागर तांदळे यांनी धुळ चारत इतिहास रचला.. दाभोळेतून शिवसेनेच्या दिपाली जाधवांचा विजय झाला. या निवडणुकीत शिवसेना ४ राष्ट्रवादी ४ तर दोन गणात भाजपा विजयी झाले असून पंचायत समितीवर महायुतीने झेंडा फडकवत दहा जण निवडून आणत ३३ वर्षांची सत्ता मोडीत काढली आहे. उबाठा सेनेचे चार असे बलाबल आहे.











































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)










































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.