loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाण्याचे माजी उपमहापौर यांच्या गेस्ट हाऊसला आग

ठाणे (प्रतिनिधी) - ठाणे महानगर पालिकेचे माजी उप महापौर असलेले गणेश साळवी याचे कळवा नागरिक आरोग्य केंद्र जवळ, विजय अपार्टमेंट समोर, मनीषा नगर गेट नंबर - १, मनीषा नगर, कळवा, ठाणे (प.) या ठिकाणी असलेल्या एका गेस्ट हाऊस मध्ये आग लागली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र फर्निचर आणि साहित्याचे नुकसान झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदरची घटना दुपारी सव्वा दोनच्या सुमारास घडली. सदर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान ०१- फायर वाहनासह, ०२- रेस्क्यू वाहनासह, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, टोरंट विद्युत पॉवरचे कर्मचारी व कळवा पोलीस कर्मचारी उपस्थित होते. सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही. घटनास्थळी सदरचे गेस्ट हाऊस हे बंद असून तेथे कोणीही राहत नव्हते. सदर गेस्ट हाऊस मधील पीओपी सीलिंग, टीव्ही, इन्व्हर्टर, लाकडी खुर्च्या, सोफा, गादी, इतर साहित्य जळाल्याने नुकसान झाले आहे.

टाइम्स स्पेशल

सदर गेस्ट हाऊसमध्ये तीन सिलेंडर होते, सदर सिलेंडर सुरक्षतेच्या कारणास्तव अग्निशमन दलाच्या ताब्यात घेण्यात आले आहेत. सदर घटनास्थळी लागलेली आग अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांच्या मदतीने ०२:३० वाजताच्या सुमारास पूर्णपणे विझविण्यात आली असून, परिस्थिती नियंत्रणात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg