loader
Breaking News
Breaking News
Foto

दाभोळमध्ये विजयी उमेदवारांची जल्लोषात मिरवणूक

दाभोळ(वार्ताहर) -दापोली मतदारसंघातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) ने अपेक्षांवर मात करत दणदणीत विजय मिळवून राजकीय वर्चस्व सिद्ध केले आहे. चुरशीच्या आणि रंगतदार लढतीनंतर जिल्हा परिषद दाभोळ गटातून शिवसेनेच्या सौ. साधना महाजन यांनी भाजपच्या स्मिता जावकर यांचा पराभव करत विजय खेचून आणला. तर पंचायत समिती दाभोळ गणात शिवसेनेच्या नम्रता तोडणकर यांनी राष्ट्रवादीच्या सारिका उजाळ आणि मनसेच्या अनुष्का महाडीक यांना पिछाडीवर टाकत मतदारांचा ठाम कौल आपल्या बाजूने वळवला. याचबरोबर पंचायत समिती बुरोंडी गणात शिवसेना शिंदे गटाच्या अंकिता घुबडे यांनी भाजपच्या स्वप्नाली साठे यांचा पराभव करत शिवसेनेचा भगवा अधिक उंचावर नेला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या तिहेरी विजयामुळे दापोली तालुक्यात शिवसेना शिंदे गटाची राजकीय पकड अधिक मजबूत झाली असून विरोधकांच्या गटात मोठी खळबळ उडाली आहे. विजयाची घोषणा होताच संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण पसरले. ढोल-ताशांच्या गजरात काढलेल्या भव्य विजय रॅलीत कार्यकर्ते आणि समर्थकांनी एकमेकांना गुलाल लावत आनंद व्यक्त केला, तर फटाक्यांच्या आतषबाजीने आकाश उजळून निघाले. “शिवसेना शिंदे गटाचा विजय असो” अशा घोषणा देत समर्थकांनी हा ऐतिहासिक विजय उत्साहात आणि अभिमानाने साजरा केला. शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड उत्साहात बॅनर हातात घेऊन विजयाचा जल्लोष साजरा केला. विजयाच्या आनंदात ते इतके भारावून गेले होते की संपूर्ण परिसर घोषणांनी दणाणून गेला.

टाइम्स स्पेशल

“शाळा पाडता पाडता शाळा पाडणारेच तोंडावर पडले, जिथे शिकली, तिथे मुकली” तसेच “दाभोळ जि.प. कन्या शाळा भल्या-भल्यांना पुरून उरली, शाळेचा नाद करायचा नाय” अशा जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी हा ऐतिहासिक विजय बॅनर, जल्लोष आणि उत्साहात साजरा केला. दाभोळ राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्यामुळे कार्यकर्त्यांनी घरीच राहणे पसंत केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg