केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडुका पार पडल्या. महायुतीने एक हाती सत्ता मिळवत विरोधकांचे पानीपत केले. ठाकरे गटातील विरोधी उमेदवारांकडून ब-यापैकी लढत देत काही उमेदवारांचा थोडक्या मतांनी पराभव झाला असला तरी पारंपारीक मतदार जागेवर असल्याचे दिसून आले. शिवसेना पक्षाचे सर्व निवडून आलेले उमेदवार हे आमदार किरण सामंत यांनी तालुक्यात केलेली विकास कामांची पोचपावती आणि आमदार सामंत यांच्यावर प्रेम करणारी जनतेमुळे हा विजय असल्याचे बोलले जात आहे.
तालुक्यात या आधी शिवसेनेची गेली पंचवीस वर्ष सत्ता होती. मात्र आता शिवसेना फुटीनंतर लांजा तालुक्यात पहील्यांदा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार निवडून आले आहेत. या आधी लांजा नगरपंचायतीवर निर्विवाद बहुमत मिळवून भगवा फडकवला. आता काही दिवसात तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालावरून विरोधी पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी धास्ती घेतली असुन यापुढे विरोधी पक्षाकडून निवडणुका लढवाव्या की नाहीत? हा प्रश्न विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांपुढे निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
लांजा राजापूर विधानसभा मतदार संघाचे किरण सामंत आमदार झाल्यानंतर अवघ्या एका वर्षाच्या कालावधीत लांजा तालुका शिवसेनामय करून सोडला आहे. किरण सामंत यांचे नेतृत्व स्वीकारून अनेक उद्योजक व्यापारी, विरोधी पक्षातील कार्यकर्ते यांनी पक्षात प्रवेश केला आहे. कार्यक्षम कार्यतत्पर आणि दूरदृष्टीतून तालुक्यात होत असलेली विकास कामे. विरोधकांनाही विश्वासात घेऊन विरोधी पक्षाच्या कार्यकर्ते यांचीही कामे केली जात असल्यामुळे किरण सामंत लोकप्रिय आमदार ठरले असुन बर्याच वर्षानंतर तालुक्याला हक्काचे नेतृत्व लाभले असल्याचे बोलले जात आहे. आमदार किरण सामंत यांचा शब्द प्रमाण मानला जात असल्यामुळे या पुढेही निवडणूकीत विरोधी पक्षाला विजय मिळविणे सोपे राहिले नसल्याचे दिसून येत आहे.











































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)










































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.