loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड तालुका भगवामय; जिल्हा परिषद–पंचायत समितीवर शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व

खेड (दिलीप देवळेकर) - खेड तालुक्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अंतिम निकालांनी तालुक्यातील राजकीय चित्र स्पष्ट केले असून शिवसेनेने ऐतिहासिक कामगिरी करत खेडवर आपली मजबूत पकड सिद्ध केली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेने स्पष्ट बहुमत मिळवत वर्चस्व प्रस्थापित केले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत खेड तालुक्यातील एकूण सात जागांपैकी सहा जागांवर शिवसेनेने दणदणीत विजय मिळवला आहे. उर्वरित एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना यश मिळाले आहे. सुकिवली, भरणे, दयाळ, विराचीवाडी, लोटे आणि धामणदिवी या गटांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी प्रतिस्पर्ध्यांवर निर्णायक मात केली. या निकालामुळे जिल्हा परिषदेत शिवसेनेची ताकद अधिक भक्कम झाली आहे. पंचायत समिती निवडणुकीतही शिवसेनेने आपली सरशी कायम राखली आहे. एकूण चौदा गणांपैकी दहा गणांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. उर्वरित तीन गणांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला, तर एका गणात राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले आहे. सुकीवली, तिसंगी, खवटी, भरणे, भडगाव, दयाळ, बहिरवली, गुणदे, विराचीवाडी आणि आंजणी या गणांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी मतदारांचा विश्वास संपादन केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या निकालांमधून खेड तालुक्यात गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या नेतृत्वावर जनतेने पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केल्याचे स्पष्ट झाले आहे. विकासकामांची अंमलबजावणी, संघटनात्मक बांधणी आणि सामान्य जनतेशी असलेला थेट संवाद याचा सकारात्मक परिणाम मतपेटीतून दिसून आला असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. निकाल जाहीर होताच खेड तालुक्यात शिवसेना कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, ढोल-ताशांच्या गजरात आणि भगवे झेंडे फडकावत जल्लोष साजरा केला. “शिवसेना जिंदाबाद” आणि “योगेश दादा कदम आगे बढो” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. जिल्हा परिषद व पंचायत समिती या दोन्ही संस्थांमध्ये शिवसेनेची सत्ता प्रस्थापित झाल्याने येत्या काळात खेड तालुक्यात विकासाला गती मिळेल, प्रशासन अधिक स्थिर आणि निर्णयक्षम होईल, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या भडगाव जिल्हा परिषद निवडणुकीत सुनील तटकरे यांचे मेव्हणे अजय बिरवटकर विजयी. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या पत्नी वरदा तटकरे तसेच आमदार अनिकेत तटकरे यांच्या पत्नी यांनी खेडमध्ये येऊन अजय बिरवटकर यांना शुभेच्छा दिल्या.

टाइम्स स्पेशल

रामदासभाई कदम यांचे बंधू माजी बाधकाम सभापती अण्णा कदम तर उबाठा पक्षानून युवानेते अजिंक्य मोरे रिंगणात होते. रत्नागिरी जिल्यात ही लढत प्रतिष्ठेची होती. कारण अण्णा कदम हे दुसन्या खाडीपट्टा भागात जाऊन निवडणूक लढत होते. यामध्ये अण्णा कदम यांनी विजयी संपादन केल्याने शिवसैनिकांनी नी एकच जल्लोष' केला. जि. प. चे माजी विरोधीपक्षनेते व माजी जि.प. सदस्य अजय बिरवटकर यांनी भडगाव जिल्हा परिषद व जामगे प. स. अपूर्वा जाधव हया रा. काँग्रेसच् दोन जागा निवडून आणून इतिहास रचला कारण भडगाव जी. प. गट गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम या गावाचा व विभागाचा समावेष या गटात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg