loader
Breaking News
Breaking News
Foto

पनवेल महानगरपालिकेच्या महापौरपदी नितीन पाटील आणि उपमहापौरपदी प्रमिला पाटील बिनविरोध

पनवेल (जितेंद्र गावडे) :- पनवेल महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजप महायुतीचे नितीन जयराम पाटील तर उपमहापौरपदी प्रमिला रविनाथ पाटील यांची आज (मंगळवार, दिनांक १०) बिनविरोध निवड झाली. शेकाप महाविकासआघाडीकडे पक्षीय बलाबल नसल्याने अखेरी त्यांना आपले उमेदवारी अर्ज मागे घ्यावे लागले. सार्वत्रिक निवडणुकीत या पूर्वीच दारुण पराभव झाल्याने महापौर उपमहापौर निवडणुकीतसुद्धा नाचक्की होऊ नये यासाठी महाविकास आघाडीला पर्याय शिल्लक राहिला नव्हता. भाजप युतीकडे स्पष्ट बहुमत असल्याने या निवडणुकीत फक्त औपचारिकता बाकी होती. निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले होते. यामध्ये ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या निवडीनंतर पनवेल शहरात भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांच्या आणि 'एकच वादा प्रशांत दादा' गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महारांच्या अश्वारूढ पुतळ्यास आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg