loader
Breaking News
Breaking News
Foto

उसनवारी पैशावरून तरुणावर कोयत्याने वार, गंभीर जखमी तरुणावर उपचार सुरू

खेड : उसने दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून दोन जणांनी एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना खेड तालुक्यातील मुरडे शिंदेवाडी येथे घडला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला वाचवण्यासाठी आलेल्या त्याच्या पत्नीलाही मारहाण करण्यात आली. याबाबत सचिन परशुराम तटकरी (वय ३२, रा. भडगाव खोंडे, मधलीवाडी, खेड) या जखमी तरुणाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित नीलेश बाबाराम खामकर याला २,००० रुपये उसने दिले होते. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास सचिन आपले पैसे परत मागण्यासाठी नीलेशच्या घरी गेला होता. मात्र, पैसे देण्यास नकार देत नीलेश याने सचिन याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली. हा वाद सुरू असतानाच बाबाराम खामकर याने घरातील कोयता आणून सचिन याच्या डोक्याच्या मागील बाजूला मारला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या हल्ल्यात सचिन याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव सुरू झाला. पतीला वाचवण्यासाठी त्याची पत्नी प्रीती तटकरी पुढे आली असता, बाबाराम खामकर याने त्यांनाही शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. या मारहाणप्रकरणी पोलिसांनी नीलेश बाबाराम खामकर आणि बाबाराम खामकर (दोघेही रा. मुरडे, शिंदेवाडी, खेड) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८ (१), ११५ (२), ३५२, ३५१ (२) (३) आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg