loader
Breaking News
Breaking News
Foto

दाभोळे जिल्हा परिषद गटातून विलास चाळके प्रचंड मतांनी विजयी

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे जि.प. गटात शिंदे शिवसेना गटाचे उमेदवार जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण अर्थ सभापती विलास चाळके यांना ५,४२० मते पडली, जिल्ह्यात सर्वाधिक मते घेवून विजयी झाले आहेत. दाभोळे जिल्हा परिषद गटातून रत्नागिरी टाइम्स ने प्रसिद्ध केलेल्या अंदाजाप्रमाणे त्यांचा विजय झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दाभोळे जिल्हा परिषद गटात विलास चाळके प्रचंड मतांनी निवडून येणार असा अंदाज रत्नागिरी टाइम्स ने ज्या दिवशी विलास चाळके यांना शिंदे शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली त्याच वेळी अंदाज व्यक्त केला होता. त्याप्रमाणे दाभोळे जिल्हा परिषद गटात विलास चाळके यांना एकूण ८,०३८ मते मिळाली तर त्यांच्या विरोधात वंचित कडून उभे असलेल्या वीरश्री बेटकर यांना २,६१८ मते मिळाली. वीरश्री बेटकर यांचा ५,४२० मतांनी विलास चाळके यांनी दारुण पराभव केला.

टाइम्स स्पेशल

विलास चाळके हे निवडून येणार हे जाहीर असताना मात्र त्यांना जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेकिंग मतदान पाडण्यासाठी कार्यकर्ते जीवाचे रान करत होते. त्याप्रमाणे मतांचा आकडा पहिल्या फेरीपासूनच विलास चाळके यांना लिडच दाखवत होता. विलास चाळके यांच्या बाजूने मतदारांनी कौल दिला असून त्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg