loader
Breaking News
Breaking News
Foto

चंद्रपूर महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेची भाजपसोबत युती

चंद्रपूर - चंद्रपूर महानगरपालिकेतील गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या सत्ता नाट्याचा मंगळवारी अत्यंत नाट्यमय शेवट झाला. कोणत्याही परिस्थीतीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवा असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याची चर्चा सुरु असताना दुपारी मात्र ठाकरे गटाने चक्क भाजपशी हातमिळवणी करत सर्वांना धक्का दिला आहे. कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेत विस्कटलेले गणित आणि भाजपने दिलेली महापौर पदाची ऑफर यामुळे चंद्रपूरात नवे राजकीय समिकरण आकारात आले आहे. भाजपच्या संगिता खांडेकर आणि कॉंग्रेसच्या वैशाली म्हाडोळे यांच्यात मतदान झाले. अवघ्या एका मताने भाजपच्या खांडेकर विजयी झाल्या. मतदानावेळी वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक गैरहजर राहिले. दोन्ही भाजप आणि ठाकरे गटात सव्वा सव्वा वर्षाचा सत्तेच्या वाटणिचा फार्म्युला निश्‍चित झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg