loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हास्तरीय तायक्वाँडो स्पर्धेत रोटरी स्कूलचे दैदिप्यमान यश

खेड (प्रतिनिधी) - दिनांक 6 ते 8 फेब्रुवारी 2026 दरम्यान तायक्वाॅंडो संघ रत्नागिरी व तायक्वाँडो असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हास्तरीय तायक्वाॅंडो अजिंक्यपद स्पर्धा 2026 छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम रत्नागिरी या ठिकाणी संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी 2 रौप्य व 7 कांस्य पदके पटकावून यश संपादन केले. सदरच्या स्पर्धेत 8 तालुक्यातून 500 हून अधिक खेळाडू सहभागी होते. यामध्ये रोटरी स्कूलचे खेळाडू निमिश शिंदे व कार्तिक चव्हाण यांनी रौप्य पदक, तसेच अर्णव भोसले, हर्षिता लांडगे, शांभवी वाघ, स्वरा चव्हाण, दिथ्वी देवाडिगा, सई गोगावले व ओम गोगावले यांनी कांस्य पदक पटकावून आपले व रोटरी स्कूलचे नाव रोशन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तायक्वाँडो संघामधील सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडाशिक्षक व तायक्वाँडो प्रशिक्षक कृणाल चव्हाण व पंचशील चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg