दापोली, (वार्ताहर) : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रथमच निवडणूक लढविणाऱ्या सौ. साधना महाजन या विजयी झाल्या आहेत. निवडणूक अर्ज दाखल करताना त्यांनी भाजपच्या उमेदवार म्हणून प्रथम उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र भाजपने त्यांना एबी फॉर्म न देता स्मिता जावकर यांना दिला. मात्र शिवसेनेचे आमदार व राज्यमंत्री योगेश कदम यांनी त्यांना एबी फॉर्म देत शिवसेनेतून उमेदवारी दिली व पक्षाची संपूर्ण ताकद त्यांच्या मागे उभी केली. त्याचा परिणाम दिसून आला व सौ. साधना मिहीर महाजन यांना या निवडणुकीत ७४५३ मते मिळाली तर स्मिता जावकर यांना ४२६५ मते मिळाली. साधना महाजन या ३१५८ मतांनी विजयी झाल्या. कोळथरे येथील महाजन कुटुंब हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक व भाजपचे पदाधिकारी म्हणून ओळखले जातात. मात्र या निवडणुकीत त्यांना भाजपने उमेदवारी न देता भाजपच्या पदाधिकारी असलेल्या सौ. स्मिता जावकर यांना उमेदवारी दिली होती. मागील जिल्हा परिषद निवडणुकीतही जावकर यांचा पराभव झाला होता.
दापोली तालक्यातील दाभोळ जिल्हा परिषद गटातील या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. भाजप व शिवसेना या दोन्ही राजकीय पक्षांनी हि निवडणूक प्रतिष्ठेची केली होती मात्र विजय शिवसेनेचाच झाला.











































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)










































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.