loader
Breaking News
Breaking News
Foto

मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा केंद्रांवर AI कॅमेऱ्याची नजर

कळंबोली : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्त विद्यापीठाच्या राज्यभर असलेल्या अभ्यास केंद्रावरील विविध शिक्षणक्रमांच्या परीक्षांच्या निरीक्षणासाठी राज्यभरातील 538 परीक्षा केंद्रांवर AI तंत्रज्ञानाने समृद्ध असलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित व गैरप्रकारमुक्त वातावरणात होण्यासाठी मा. प्र, कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या नियोजनानुसार विद्यापीठ प्रशासनाने हे प्रगतीशील पाऊल उचलले आहे. या परीक्षा दिनांक 21 मे 2026 पासून सुरू होत आहेत. तसेच पदवी आणि पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रमांच्या मुख्य परीक्षा या 27 मे पासून सुरू होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विद्यापीठाच्या आठही विभागीय केंद्रांतर्गत असणाऱ्या परीक्षा केंद्रांवर आता अत्याधुनिक AI तंत्रज्ञानाने समृद्ध असलेले सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. नाशिक येथील विद्यापीठ मुख्यालयातील नियंत्रण कक्षातून राज्यभरातील सर्व परीक्षाकेंद्रांवरील प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यापासून ते उत्तरपुस्तिका सीलबंद होईपर्यंतच्या सर्व हालचाली मॉनिटर करण्यात येणार आहे. तसेच परीक्षा कालावधीतील सीसीटिव्ही छायाचित्रणदेखील उपलब्ध असेल असे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव व वित्त अधिकारी मा. डॉ. गोविंद कतलाकुटे आणि मा. परीक्षा नियंत्रक भटप्रसाद पाटील यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

मुंबई विभागीय केंद्र अंतर्गत येणाऱ्या मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांमधील 30 परीक्षा केंद्रांवरील परीक्षा आता सीसीटीव्ही च्या निगराणीत होणार असून याचे नियंत्रण विभागीय केंद्र आणि मुख्यालय अशा दोन्ही स्तरांवर करण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी मुंबई विभागीय केंद्रांतर्गत असलेल्या सर्व परीक्षा केंद्रांनी जे सहकार्य केले त्याबद्दल विभागीय संचालक डॉ. वामन नाखले यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg