loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाणे तहसीलदार कार्यालयाचे नावे बनावट उत्पन्न दाखला बनविण्याचा प्रकार उघडकीस, दोघांवर गुन्हा दाखल

ठाणे (प्रतिनिधी) - ठाणे तहसीलदार कार्यालयात बनावट दस्त बनवून त्याद्वारे बनावट उत्पन्नाच्या दाखला तयार केल्याचा प्रकार समोर आला. तहसीलदार कार्यालयाला याचा थांगपत्ताच नाही. सदरचा प्रकार उघडकीस आल्यानंतर मात्र तहसील कार्यालयातील ग्राम महसूल अधिकारी जीवन निवृत्ती कोरे (५३) यांनी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात संशयित प्रविण जोशी आणि शिरीष साठे या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वागळे इस्टेट पोलीस अधिक तपास करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

२७ एप्रिल २०२६ रोजी योगेंद्र भोलाप्रसाद गुप्ता या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ चालकाने तहसीलदार कार्यालयाकडे एका उत्पन्न प्रमाणपत्राच्या पडताळणीबाबत तक्रार अर्ज दिला होता. चौकशीत रमेश एकनाथ शिंदे यांच्या नावाने वर्ष २०२५-२६ साठी २ लाख ४० हजार रुपयांचे उत्पन्न प्रमाणपत्र तयार करण्यात आल्याचे समोर आले. मात्र, संबंधित दाखला अधिकृत प्रणालीवर उपलब्ध नसल्याचे निष्पन्न झाले. रमेश शिंदे हे उपचारासाठी हाजुरी येथील महावीर जैन रुग्णालयात दाखल होते. त्यांची मुलगी तेजस्वी शिंदे हिने वडिलांच्या उपचारासाठी आवश्यक असल्याने आधारकार्ड, पॅनकार्ड, फोटो आणि रेशनकार्ड अशी कागदपत्रे शिरीष साठे याला दिली होती.

टाईम्स स्पेशल

उत्पन्न दाखला काढून देण्याच्या मोबदल्यात त्याने ऑनलाइन क्यूआर कोडद्वारे १ हजार ८५० रुपये स्वीकारल्याचे समोर आले. ही रक्कम प्रविण महादेव जोशी यांच्या बँक खात्यात जमा झाल्याचेही चौकशीत स्पष्ट झाले. यापुढील पडताळणीत संबंधित उत्पन्न दाखल्यावरील क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर कोणतीही माहिती पोर्टलवर दिसून आली नाही. तसेच दाखल्यावरील जावक क्रमांक तहसील कार्यालयाच्या नोंदीत अस्तित्वात नसल्याचे आढळले. याशिवाय, नायब तहसीलदार दत्तात्रय बोर्डे यांच्या नावाची बनावट सही करण्यात आल्याचेही निष्पन्न झाले आहे. या प्रकारामुळे तहसील कार्यालयाच्या ऑनलाइन प्रमाणपत्र प्रणालीच्या गैरवापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg