loader
Breaking News
Breaking News
Foto

खारघर वृक्षतोडीबाबत सिडको वृक्ष प्राधिकरणाची सुनावणी; विविध मुद्द्यांवर चर्चा, वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींचा विरोध

कळंबोली: खारघरमधील उच्च विद्युत वाहिनी भूमिगत करण्यासाठी खारघरमधील झाडांवर कत्तलीची गदा येणार आहे. सिडकोने झाडांच्या कत्तली बाबत निर्णय घेतल्यानंतर पर्यावरण प्रेमींमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले. याबाबतची प्रामुख्याने हरकत खारघर मधील युवा प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील यांनी लेखी पत्रानुसार हरकत नोंदविली. सिडको वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत खारघर परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडी संदर्भात सामाजिक संस्था व नागरिकांनी सादर केलेल्या हरकतींवर शुक्रवारी रायगड भवन येथे सुनावणी आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीस युवा प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण प्रकाश पाटील, शेखर सावंत (कोकण कृषी विकास प्रतिष्ठान) माजी नगरसेविका नेत्रा किरण पाटील, पर्यावरणप्रेमी ज्योती नाडकर्णी यांच्यासह इतर नागरिक व सदस्य उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खारघरमधील प्रस्तावित झाडांच्या कत्तली संदर्भात घेण्यात आलेल्या जन सुनावणीमध्ये सिडको प्रशासनाच्यावतीने उद्यान अधिकारी गीता सावंत, सहाय्यक उद्यान अधिकारी रोहित मेमाणे, कार्यकारी अभियंता नंदकुमार कुलकर्णी, वरिष्ठ नियोजनकार मिथिलेश पाटील तसेच सहाय्यक कार्यकारी अभियंता रवी कराड उपस्थित होते. सदर बैठकीत प्रस्तावित वृक्षतोड, संबंधित कामांची आवश्यकता, परिसरावरील परिणाम तसेच विविध तांत्रिक बाबींवर सविस्तर साधक-बाधक चर्चा करण्यात आली. चर्चेदरम्यान संबंधित जागेवर सिडकोच्या नियोजन विभागाकडून अद्याप स्पष्ट स्वरूपाचे नियोजन नसल्याचे सांगण्यात आले. स्पष्ट स्वरूपाचे नियोजन नसताना उच्च दाब विद्युत वाहिनी भूमिगत करण्याचे तसेच त्या अनुषंगाने वृक्षतोड प्रस्तावित करणे यावर उपस्थित सदस्यांनी हरकत मांडली.

टाईम्स स्पेशल

तसेच सिडकोच्या विद्युत विभाग व नियोजन विभागाच्या समन्वयातून सुरू असलेल्या उच्च दाब वाहिन्यांच्या भूमिगत करण्याच्या कामाबाबत काही उपस्थितांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले. सदर कामातून एखाद्या खाजगी कंत्राटदार अथवा संभाव्य बांधकाम प्रकल्पास लाभ मिळण्याची शक्यता असल्याचा प्रथमदर्शनी संशय काही सदस्यांनी व्यक्त केला. या अनुषंगाने संबंधित बाबींची सखोल चौकशी व्हावी तसेच प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राखण्यात यावी, अशी मागणी युवाप्रेरणा सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आली. याबाबत युवाप्रेरणा सामाजिक संस्थेकडून सिडको प्रशासनाकडे लेखी निवेदन देखील सादर करण्यात आले असून, पर्यावरण संरक्षण, नागरिक हित व सार्वजनिक संसाधनांचा योग्य वापर याबाबत संबंधित प्रशासनाने स्पष्ट भूमिका घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg