loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबईतील भिकारी निघाला मेडिकलचा विद्यार्थी

मुंबई - मुंबई शहरातील मालाड पोलिस स्टेशनच्या हद्दीत वीशीतील एक तरुण भिकारी म्हणून भटकताना आढळून आला. केस वाढलेले, अंगावर मळलेले कपडे, पायात फाटक्या चप्पल अशा स्थितीत तो शहरातील काही भागात भिक मागताना दिसला. रात्रीच्या वेळी तो दुकानाच्या आडोशाला झोपायचा. पोलिसांनी त्याला हटकले असता. तो घाबरला त्याला काही बोलता येईना शेवटी त्याला माडाल पोलिस स्थानकात आणण्यात आले. कोमट पाण्याने त्याला अंघोळ घालण्यात आली. जेवण दिले त्यानंर त्याने आपले नाव आणि गावं सांगितले. त्याचे नाव अभय असे असून नांदेड जिल्ह्यातील तामसा होमियोपॅथिकच्या तिसर्‍या वर्षाचा विद्यार्थी आहे. रेल्वेने प्रवास करताना त्याची बॅग हरवली आणि त्याच्या समोर भिक मागण्याशिवाय पर्याय उरला नाही. नांदेडमध्ये त्याची बेपत्ता म्हणून तक्रार दाखल होती. कॉन्स्टेबल कोमलसिंग जाधव यांनी त्याला आधार दिल्याने त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg