loader
Breaking News
Breaking News
Foto

हातखंबा येथे रत्नागिरी जिल्हा गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचा जिल्हा मेळावा संपन्न

लांजा (संजय साळवी) - रत्नागिरी जिल्हा गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचा जिल्हा मेळावा नुकताच सिद्धगिरी हॉल हातखंबा, रत्नागिरी येथे पार पडला. कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर रत्नागिरी जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नागिरी श्री. माईणकर, संघटनेचे राज्याध्यक्ष शिवाजीराव कोलते-पाटील व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी पोलीस पाटलांना मार्गदर्शन करताना जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी महामुनी म्हणाले की, या जिल्ह्यातील बहुतांश गावातील तरुण व मध्यमवयीन वर्ग नोकरी धंद्यानिमित्त मोठ्या शहरात स्थलांतरित झाले आहेत, त्यामुळे एकाकी जीवन जगणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण खूप आहे. आम्ही पोलीस पाटीलांच्या सहकार्याने त्यांचा शोध घेवून अशा ५० हजार ज्येष्ठ नागरिकांचा डाटा तयार केला आहे. पोलीस पाटील व ठाणे अंमलदारांच्या साथीने आम्ही अशा ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस साजरा करतो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. माईणकर म्हणाले की, माझे आजोबा पोलीस पाटील होते, त्यामुळे पोलीस पाटलांचे कामकाज हे मी अगदी माझ्या बालपणापासून जवळून पाहिलेले आहे. शासनाचा हक्काचा व विश्वासाचा व ग्रामस्थांना योग्य न्याय मिळवून देणारा हक्काचा माणूस म्हणजे पोलीस पाटील होय असे गौरवोद्गार त्यांनी काढले. यावेळी आपला जीव धोक्यात घालून पर्यटकांचे जीव वाचविल्याबद्दल आदेश कदम आणि संतोष पाथरे या दोन पोलीस पाटलांचा अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. माईणकर व पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या हस्ते संघटनेच्यावतीने करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

यावेळी संस्थापक सचिव कमलाकर मांगले-पाटील, कार्यकारी अध्यक्ष बळवंतराव काळे, कार्याध्यक्ष विजय घाडगे, सचिव महादेव भालेराव, उपाध्यक्ष अरुण बोडखे, सहसचिव डी. एस. कांबळे, राज्य संघटक नवनाथ धुमाळ, दादा भिसे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष तथा संस्थापक सदस्य राजेंद्र भामद्रे, ज्ञानोबा काटकर, संस्थापक सदस्य, संतोष पवार, गडचिरोली जिल्हाध्यक्ष योगेश नाकाडे, गोंदिया जिल्हाध्यक्ष राजेंद्र बनसोड, नागपूर जिल्हाध्यक्ष रितेश दुर्गकर, आप्पासो गायकवाड, सातारा जिल्हाध्यक्ष रवींद्र जाधव नाशिक जिल्हाध्यक्ष सागर शिंदे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष गणेश ढेने, रायगड जिल्हाध्यक्ष भारत मार्कंड, सिंधुदुर्ग जिल्हा सचिन सावंत तसेच सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg