loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर विकास आराखड्यासंदर्भात हरकतींचा विचार होणार - कोकण विभाग सहसंचालक श्रीकांत देशमुख

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर शहरांमध्ये अत्यंत संवेदनशील सुरू असलेल्या गुहागर शहर विकास आराखडा विषया संदर्भात भाजपाचे गटनेते तथा बांधकाम सभापती उमेश भोसले, स्वीकृत नगरसेवक संतोष सांगळे, अद्वैत जोशी, प्रथमेश दामले, गुहागर नगर रचनाकार प्रणव वेद्रे यांनी सहसंचालक श्रीकांत देशमुख नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग कोकण विभाग कोकण भवन नवी मुंबई येथे जाऊन भेट घेतली आणि गुहागर वाशियांनी घेतलेल्या हरकती आणि सुचनांना संदर्भात विस्तृत चर्चा केली. गुहागर तालुक्याच्या समस्या जाणून घेण्यासाठी नुकतेच भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्विय सहाय्यक संतोष साखरे गुहागर येथे जनता दरबार घेण्यासाठी आले होते. यावेळी नगराध्यक्षा नीता मालप यांच्यासह सर्व भाजपच्या नगरसेवकांनी विकास आराखडा संदर्भात समस्या मांडल्या आणि सहसंचालक यांच्या समोर हा विषय होणे गरजेचे असल्याने सदरच्या बैठकीचे नियोजन करून दिले होते. माजी आमदार डॉ.विनय नातू यांच्या मार्गदर्शनाने सदर बैठक घेण्यात आली. या बैठकीला नगराध्यक्षा तब्बेतीच्या कारणामुळे उपस्थित राहू शकल्या नाहीत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गुहागर नगपंचायत विकास आराखड्या मधील अन्यायकारक तरतुदी तसेच मागील हरकती बाबत विचार विनिमय करण्याबाबत विशेष सभेच्या ठरावाचे निवेदन सहसंचालक यांना दिले. या वेळी सहसंचालक श्रीकांत देशमुख यांनी तब्बल दीड तास गुहागर विकास आराखडा संदर्भात समस्या जाणून घेतल्या. गुहागर शहरांची भौगोलिक रचना अठरा मिटर, नऊ मिटर, महामार्ग तीस मिटर असे रस्त्याचे विणले जाणारे जाळे शहराच्या विकासाला आणि मानवी वस्तीला हानिकारक असल्याचे उपस्थितांनी सांगितले.तर याबाबत आपल्याला पर्यायी मार्ग असल्याचे सूचित केले. मालकी आरक्षित पडलेल्या जागांचे आरक्षण रद्द करून नगरपंचायत मालकीच्या जागांवर आरक्षण करावे असेही सूचित केले. ब्लू फ्लॅग बीच, कासव संवर्धन आणि गुहागर चे निसर्ग सौंदर्य. गुहागरची सुरक्षा प्रश्न पार्किंग व्यवस्था,या बाबत सविस्तर चर्चा झाली अंती सहसंचालक देशमुख यांनी नागरिकांच्या सूचना व हरकती यांच्या पूर्णपणे विचार होईल.आपण गुहागर शहरला प्रत्यक्षपणे भेट देऊन शहराची पाहणी करणार असल्याचे आश्वासित केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg