loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये 28 एप्रिल रोजी जनता दरबार

खेड (प्रतिनिधी) - भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) प्रदेशाध्यक्ष आणि बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे विशेष कार्य अधिकारी (एसडीओ) संतोष साखरे यांचा जनता दरबार मंगळवारी (२८ एप्रिल) सार्वजनिक बांधकाम खात्याचे शासकीय विश्रामगृह डाग बंगला येथे सकाळी १० ते ४ या वेळेमध्ये होणार आहे. यात खेड तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांनी आपल्या भागातील मंत्रालय, महसूल, आरोग्य, एसटी, महावितरण, बांधकाम खाते, जिल्हा परिषद बांधकाम, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग, कृषी खाते विकास कामे, भूमी अभिलेख, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस, नगर प्रशासन आणि इतर विभागातील समस्या, तसेच शासकीय दिरंगाईची कामे मार्गी लावण्यात येणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नागरिकांनी आपली निवेदने घेऊन या जनता दरबारामध्ये सामील व्हावे, असे आवाहन भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष ॲड.वैभव खेडेकर यांनी केले आहे. प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे खेड, दापोली विधान सभा मतदार संघातील विकास कामांवर विशेष लक्ष केंद्रीत करून विकास कामांना चालना देण्यासाठी व भाजप पक्षाची फळी मजबुत करुन पक्षाची पकड बसविणार आहेत. जनता दरबारातुन खेड मधील विकास कामांना चालना मिळणार असल्याने भाजपचे नेते वैभव खेडेकर यांचीही यामुळे पक्षात वजन वाढणार असून जनतेच्या समस्या ही सुटणार आहेत. भाजय पक्षाने गुहागर व चिपळूण विधान सभा मतदार संघातील जनता दरबारानंतर खेडमधील भाजपचा जनता दरबाराला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

टाईम्स स्पेशल

भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे मा. नगराध्यक्ष अॅड. वैभव खेडेकर यांनी नागरिकांना केले आवाहन – 28 एप्रिल ला "नागरिकांनी आपली निवेदने घेऊन या आणि जनता दरबारामध्ये सामील व्हा" असे आव्हान केले आहे विकास कामांची गंगा । खेडमध्ये येणार असल्याने तसेच प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे मुख्यत वैभव खेडेकर व खेडकडे विशेष लक्ष दिल्याने खेडवासियांत समाधानाचे वातावरण पसरले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg