loader
Breaking News
Breaking News
Foto

कडवई, घोसाळकर कोंड येथे रविवार दिनांक २६ एप्रिल रोजी श्री देवी तुळजाभवानीचा गोंधळ

रत्नागिरी - समस्त पवार घोसाळकर कुटुंबियांची कुलस्वामीनी असलेल्या श्री देवी तुळजाभवानीचा त्रैवार्षिक (पांजीचा) गोंधळ रवि. दि. २६ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आला असून या गोंधळ कार्यक्रमाला सर्व घोसाळकर व पवार मंडळींनी सहकुटुंब सहपरिवार अगत्यपूर्वक उपस्थित रहावे असे आवाहन ‘कडवई (घोसाळकर कोंड) विकास मंडळा’चे वतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सर्व घोसाळकर व पवार कुटुंबियांची कुलस्वामीनी असलेल्या श्री देवी भवानीचा हा गोंधळ दर ३ वर्षांनी कडवई येथे संपन्न होतो. त्यानुसार हा श्री देवी तुळजाभवानीचा त्रैवार्षिक (पांजीचा) गोंधळ रवि. दि. २६ एप्रिल २०२६ रोजी घोसाळकर कोंड, कडवई येथे आयोजित करण्यात आला आहे. या गोंधळाचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे - १) स. ८ वा. - भवानी मातेचे पूजन, मांड भरणे, सामाईक व वैयक्तिक नवस अर्पण करणे, भवानी मातेची आरती २) स. १० वा. - कुमारिका पूजा व अल्पोपहार ३) दु. १२ वा. - स्नेहभोजन, ४) सायं. ३ ते ६ - आई भवानीची ओटी भरणे, ५) सायं. ४ वा. ‘ जोगवा मागणे ६) सायं. ६ वा. - मुख्य मांड मांडणे, दिवट्या पेटविणे, आई भवानीचा गोंधळ, नवस बोलणे ७) रात्रौ ८ ते १० - महाप्रसाद. त्यानंतर गोंधळी मंडळी गोंधळाचे पारंपारिक कथानक कथन करतील.

टाईम्स स्पेशल

तरी या श्री देवी तुळजाभवानीच्या त्रैवार्षिक गोंधळ कार्यक्रमाला सर्व घोसाळकर पवार बंधु भगिनींनी सहकुटुंब व सहपरिवार अगत्यपूर्वक उपस्थित रहावे आणि गोंधळाचा तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन ‘कडवई (घोसाळकर कोंड) विकास मंडळा’तर्फे अध्यक्ष श्री. लक्ष्मीकांत घोसाळकर, सेक्रेटरी श्री. संजय घोसाळकर व खजिनदार श्री. प्रकाश घोसाळकर यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg