loader
Breaking News
Breaking News
Foto

कडवई बाजारपेठ येथे शुक्र.दि. १ मे रोजी रिक्षा संघटनेतर्फे श्री सत्यनारायण पूजा

कडवई रिक्षा मालक - चालक संघाच्या वतीने शुक्र. दि.१ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा व भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांचा व तीर्थ प्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन कडवई रिक्षा मालक - चालक संघाच्या वतीने करण्यात आले आहे. दरवर्षी महाराष्ट्र दिनी कडवई रिक्षा मालक - चालक संघाच्या वतीने सत्यनारायणाची पूजा व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात त्यानुसार यावर्षीही आयोजित करण्यात आले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाराष्ट्र दिनानिमित्त शुक्र. दि. १ मे २०२६ रोजी कडवई बाजारपेठ, ता. संगमेश्वर येथे ही सत्यनारायणाची पूजा संपन्न होईल. सविस्तर कार्यक्रम पुढील प्रमाणे - १) स. १० ते रात्रौ ९ - तीर्थप्रसाद २) दु. १२ ते ३ - महाप्रसाद ३) दु. २ ते ६ - भगिनींसाठी हळदीकुंकू ४) दु. ३ ते ५ - रिक्षा संघटनेतर्फे भजन ५) सायं. ६ ते ८ - हरिपाठ, महाविष्णू चैतन्य नामप्रसारक मंडळ, तांबेडी, शेनवडे पंचक्रोशी ६) रात्रौ १० वा- श्री समर्थ नाट्यगंधा (रिक्षा संघटना) प्रस्तुत कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाटक ‘‘तो कोण होता?’’ ७) रात्रौ ११ वा- गुणवंतांचा सत्कार सोहळा. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. राजवर्धन करपे व संगमेश्वरचे पोलिस निरीक्षक श्री. राजाराम चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तरी कडवई पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी तीर्थप्रसादाचा व अन्य कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन कडवई रिक्षा मालक - चालक संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg