loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये जंगलात तरुणाचा मृतदेह आढळला; आकस्मिक मृत्यूची नोंद

खेड - खेड तालुक्यातील तळवटपाल येथे एका ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सुरेश पांडुरंग आखाडे (रा. तळवटपाल, गणेशवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश आखाडे हे कामाला जातो असे सांगून घरातून बाहेर पडले होते. मात्र, त्यानंतर ते बेपत्ता झाले. शोध घेतला असता, तळवटपाल-देऊळवाडी येथील डांबरी रस्त्याच्या खालच्या बाजूला असलेल्या लेंडवहाळ या जंगलमय भागात त्यांचा मृतदेह आढळून आला. ही घटना २४ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. रात्री ११.४९ वाजता या प्रकरणाची अधिकृत नोंद करण्यात आली असून, मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg