loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्ह्यात ग्रामसडक योजनेच्या कामांना वेग

​रत्नागिरी : ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सक्षम करण्याच्यादृष्टीने जिल्ह्यात प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (टप्पा-३) आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजना (टप्पा-२) अंतर्गत कामांनी वेग घेतला आहे. या दोन्ही महत्त्वाकांक्षी योजनांमधून जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७७ कामे पूर्ण झाली आहेत. यामुळे ३०० किमी अधिक लांबीचे रस्ते चकाचक झाले आहेत. यामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा वाटा मोठा असून राजापूर, चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यांत कामांचा धडाका पाहायला मिळत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात जिल्ह्यात एकूण २८ कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये राजापूर तालुक्याने बाजी मारली असून ७ कामांच्या माध्यमातून ४०.४५ किमी लांबीचे रस्ते पूर्ण झाले आहेत. त्यापाठोपाठ चिपळूण तालुक्यात ४२.६९ किमी लांबीची ४ कामे पूर्ण झाली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, गुहागर तालुक्यात या योजनेअंतर्गत अद्याप एकही काम पूर्णत्वास गेलेले नाही. ​मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यात एकूण ४९ कामे पूर्ण झाली आहेत. या योजनेत चिपळूण (११ कामे) आणि खेड (१० कामे) तालुक्यांनी आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे, ज्या गुहागर तालुक्यात प्रधानमंत्री योजनेचे काम संथ आहे, तिथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ८ कामे पूर्ण करत २१.१८ किमीचे रस्ते तयार करण्यात आले आहेत.

टाइम्स स्पेशल

जिल्ह्यात दोन्ही योजनांचा एकत्रित विचार करता, ग्रामीण भागातील दळणवळणाची स्थिती सुधारताना दिसत आहे. राजपूर आणि चिपळूण या तालुक्यांमध्ये रस्त्यांच्या लांबीचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामुळे शेतीमाल बाजारपेठेपर्यंत पोहोचवणे आणि पावसाळ्यात होणारी ग्रामस्थांची गैरसोय दूर होण्यास मोठी मदत होणार आहे. रस्ते विकासामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी गती मिळण्याची चिन्हे आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg