loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सल्लागारपदी लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल - कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सल्लागारपदी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. रत्नागिरीच्या मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकात कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, अध्यक्षा नमिता कीर, कार्याध्यक्ष डॉ.प्रदीप ढवळ यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांची ही निवड केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची निवड झाल्याबद्दल कोकण मराठी साहित्य परिषद रायगड जिल्ह्याकडून अभिनंदन करण्यात आले. केंद्रीय जिल्हा प्रतिनिधी गणेश कोळी, ज्येष्ठ साहित्यिक, कोमसाप नवीन पनवेल शाखेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. चंद्रकांत मढवी तसेच एडवोकेट मनोज म्हात्रे, कवी गणेश म्हात्रे, संजय कदम, श्याम पुंडे, संजय गोडसे, भालचंद्र जुमलेदार, समीर वेश्वीकर आदींनी प्रत्यक्ष भेटून अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg