loader
Breaking News
Breaking News
Foto

नॅशनल सायन्स ऑलिंपियाड या द्वितीय पातळीवरील परीक्षेमध्ये (एन.एस.ओ.) रोटरी स्कूलचे सुयश

खेड (प्रतिनिधी) - सायन्स ऑलिंपियाड फाउंडेशन मार्फत घेण्यात आलेल्या नॅशनल सायन्स ऑलिंपियाड (एन.एस.ओ.) या द्वितीय पातळीवरील परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. सदरच्या परीक्षेमध्ये इयत्ता सहावीतील अर्णव घुमरे याने 60 पैकी 60 गुण मिळवत आंतरराष्ट्रीय क्रमांक 7 तसेच विभागीय क्रमांक 3 पटकावला. त्याला ₹2500 रोख पारितोषिक व विभागीय रौप्यपदक प्रदान करण्यात आले. तसेच आरव सुर्वे याला विभागीय प्राविण्य प्रमाणपत्र व ₹500 बक्षीस, इयत्ता आठवीतील प्रणव गांगर्डे याला ₹1000 रोख पारितोषिकासह विभागीय कांस्यपदक आणि शौर्य गावस यालाही ₹500 पारितोषिक व विभागीय प्राविण्य प्रमाणपत्राने गौरविण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सर्व विज्ञान विषय शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg