loader
Breaking News
Breaking News
Foto

चोरवणे गावच्या पुरातनकाळीन आदिशक्ती श्री रामवरदायिनी देवीचा २ एप्रिल रोजी वार्षिक यात्रा उत्सव

खेड (दिलीप देवळेकर) - रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चोरवणे गावातील पुरातनकाळीन श्री रामवरदायिनी देवीची यात्रा दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती गुरुवार दिनांक २ एप्रिल २०२६ रोजी संपन्न होणार आहे. सकाळी ८ वाजता मंदिरात स्थापित देवदेवतांची महापूजा, सकाळी ९ ते १० वाजता लाटेची पुजा व लाट पाडणे, सकाळी १० ते १२ वाजता लाटेची मिरवणूक, दुपारी १२.३० ते २ वाजेपर्यंत महाप्रसाद, सायंकाळी ५ ते ६ वाजता लाट बगाडावर चढविणे, सायंकाळी ६ ते ७ वाजता देवीची महाआरती, रात्री ८ ते ९.३० वाजता महाप्रसाद, रात्री ९.३० ते १०.३० निमंत्रित पालख्यांचे आगमन, स्वागत, पालखी भेट, रात्री १०.३० ते १२ वाजता निमंत्रीत पालख्यांसह श्री रामवरदायिनी मातेचा छबिना (पालखी प्रदक्षिणा), रात्री १२ वाजता आराध्य प्राप्ती प्रस्तुत शाहीर रत्नाकर महाकाल यांचा लोकनाट्य तमाशा हा दैदिप्यमान सोहळा पाहण्यासाठी सहकुटूंब, सहपरिवार, मित्र मंडळी उपस्थित राहावे व दर्शन सोहळ्याचा लाभ घ्यावा. चोरवणे ग्रामस्थ, श्री रामवरदायिनी देवस्थान कमिटी आणि सभासद व ग्रामविकास मंडळ चोरवणे मुंबई,पुणे यांच्यावतीने आग्रहाचे निमंत्रण करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg