कळंबोली : कळंबोली नवी मुंबईतील वैद्यकीय क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या एम जी एम आरोग्य विद्यापीठाचे प्र. कुलगुरू, हार्ट सर्जन डॉ. समीर सुधीर कदम यांचे नुकतेच वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी एम जी एम हॉस्पिटल, वाशी, नवी मुंबई येथे निधन झाले.डॉ समीर यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी लिंबगाव, नांदेड येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. समीर कदम तत्कालीन शिक्षण मंत्री कमलकिशोर कदम यांचे पुतणे आणि एकत्रित परिवाराचे सदस्य होते. नवी मुंबई येथील वैद्यकीय क्षेत्रातील शिल्पकार डॉ. सुधीर कदम यांनी आपले बंधु कमलकिशोर कदम आणि अंकुश कदम यांच्या मार्गदर्शनाने आणि डॉ. नितीन कदम यांच्या मदतीने नवी मुंबई येथील एम जी एम संस्थेच्या पाच अद्यावत हॉस्पिटल मार्फत गेल्या ३८ वर्षा पासून लाखों रूग्णांना सेवा दिली असून येथील वैद्यकीय महाविद्यालय जवळपास दहा हजार नवीन डॉक्टर्स घडवले आहेत. रुग्णांची प्रामाणिक सेवा आणि लोकांचे प्रेम त्यांच्या स्वभावात ओतप्रोत भरलेले होते. डॉ. समीर सुधीर एम जी एम आरोग्य विद्यापीठाचे प्र. कुलगुरू, हार्ट सर्जन होते.
एवढ्या मोठ्या पदांवर असतानाही त्यांना गर्व कधीच नव्हता, सर्वांशी ते आदराने आणि नम्रपणाने वागत, त्यामुळेच लहानापासून मोठ्यापर्यंत त्यांच्या प्रति सर्वांना आदर होता, प्रेम होते. डॉ.समीर यांनी "हॉस्पिटल हाच माझा धर्म, रुग्णाची सेवा हिच ईश्वर सेवा" अंगीकृत केले होते, आजारपणात पण ते नित्य हॉस्पिटल मध्ये येत होते, अखेरच्या क्षणा पर्यंत त्यांनी रुग्णांची सेवा केली. हजारो रुग्णांचे दुःख दूर केले. डॉ.समीर यांची आकस्मिक निधनाची वार्ता समजताच नवी मुंबई शोकसागरात बुडाली, हजारो एम जी एम चा स्टाफ आणि त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना अत्यंत दुःख झाले आहे. डॉ समीर यांच्या अकाली जाण्याने वैद्यकीय क्षितिजा वरील एक तेजस्वी तारा निखळला असून, संपूर्ण एम जी एम परिवार, कदम परिवार पोरकं झाले आहे.एक संवेदनशील प्राध्यापक, एक निष्ठावंत, प्रामाणिक डॉक्टर, एक तज्ज्ञ निपुण हार्ट सर्जन व एम जी एम परिवारातील एक रत्न हरपल हरपल्याची भावना नवी मुंबईतील निष्णांत डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.















































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)
































































































































































































































































































































.jpg)
























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.