loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड तालुक्यातील वावे गावच्या श्री चंडिका देवीची ४ एप्रिल रोजी यात्रा

खेड (प्रतिनिधी) - खेड तालुक्यातील वावे गावातील ग्रामदेवी श्री चंडिकामाता देवीची शनिवार दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी यात्रा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. सकाळी १०.०० वाजता लाट चे पूजन करून लाट पाडणार आहेत. दुपारी महाप्रसाद होऊन ३.०० वाजता, लाटेची मिरवणूक काढून लाट मंदिरात आणण्यात येईल, सायंकाळी ६.०० वाजता लाट/बगाड खरखांबा वर स्थापण करण्यात येनार आहे. रात्री ९.०० वाजता १५ गावतील निमंत्रित पालख्यांचे यात्रे करिता आगमन होईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रात्री १०.३० वाजता ढोल ताश्याच्या गजरात व सनई च्या सुरात आलेल्या पालख्या सहित ग्रामदेवी ची पालखी मंदिराच्या सभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी पालख्या नाचत गाजत छबिना काढण्यात येईल.त्यानंतर रात्री १२.०० वाजता पारंपरिक रितीप्रमाणे लोकनाट्य तमाशा होईल. श्री चंडिका मातेच्या भाविक भक्तांनी परिवार व मित्र मंडळी सह बहुसंख्येने उपस्थित राहून यात्रेत सहभागी व्हावे. असे आव्हान वावे तर्फ खेड ग्रामस्थ, श्री चंडिका माता देवस्थान कमिटी आणि श्री चंडिका माता विकास मंडळ मुंबई, पुणेच्या वतीने करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg