loader
Breaking News
Breaking News
Foto

वराडकर बेलोसे महाविद्यालयाचे विद्यार्थीप्रिय माजी प्राध्यापक हरिप्रसाद लढ्ढा यांचे अल्पशा आजाराने निधन

दापोली (वार्ताहर) : दापोली येथील वराडकर बेलोसे महाविद्यालयाचे विद्यार्थीप्रिय माजी प्राध्यापक हरिप्रसाद लढ्ढा यांचे अल्पशा आजाराने काल गुरुवार, २६ मार्च २०२६ रोजी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. एक अभ्यासू, शिस्तप्रिय आणि विद्यार्थ्यांवर अपार प्रेम करणारे शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती. महाविद्यालयाच्या स्थापनेपासून कार्यरत असलेले ज्येष्ठ व प्रथम प्राध्यापक प्रा. लढ्ढा यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेक माजी विद्यार्थी व सरांचे स्नेही यांनी गिम्हवणे येथील सरांच्या निवासस्थानी जावून त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. मौजे दापोली येथील स्मशानभूमीत त्यांचेवर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg