loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी; चालकावर गुन्हा दाखल

दापोली (विशेष प्रतिनिधी) : दापोली-खेड मार्गावर वाकवली शिरशिंगे फाटा येथे उशिरा रात्री भीषण अपघात घडला असून एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी एसटी बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याने दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरहून दापोलीकडे येणारी एसटी बस (क्रमांक MH 20 BL 1676) वाकवली शिरशिंगे फाटा येथे पोहोचली असता चालक स्वप्नील बाळकृष्ण माने याने बस भरधाव वेगात आणि चुकीच्या बाजूने चालवली. याचवेळी समोरून येणाऱ्या हिरो डेस्टिनी दुचाकीला (क्रमांक MH 08 F 5350) जोरदार धडक बसली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या अपघातात दुचाकीस्वार गणेश नंदकुमार सातनाक (वय ४२, रा. वाकवली) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या नाक व तोंडाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी लक्ष्मण विठ्ठल नाटेकर (वय ४८) यांनी दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी बस चालक स्वप्नील माने याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(अ) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा रजिस्टर क्रमांक ४४/२०२६ नुसार नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार बुरोंडकर हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करत असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg