loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये पेट्रोल-डिझेलचा तुटवडा, ९०% पंप तात्पुरते बंद

खेड (प्रतिनिधी) - रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात सध्या पेट्रोल आणि डिझेलचा गंभीर तुटवडा निर्माण झाला असून यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील जवळपास ८० ते ९० टक्के पेट्रोल पंप तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहेत. परिणामी, उर्वरित सुरू असलेल्या पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून पर्यटकांसह स्थानिक नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम इंधन पुरवठ्यावर होत असल्याचे दिसून येत आहे. याआधी गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा फटका बसल्यानंतर आता पेट्रोल आणि डिझेलची कमतरता प्रकर्षाने जाणवत आहे. बुधवारी मध्यरात्री काही पेट्रोल पंपांवर अचानक इंधन संपल्याने ते बंद करण्यात आले, त्यावेळी नागरिकांमध्ये संभ्रम आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

काही ठिकाणी परिस्थिती इतकी बिघडली की, संतप्त नागरिकांनी पंपावरील कर्मचाऱ्यांना जाब विचारत धक्काबुक्कीचे प्रकारही घडल्याची माहिती समोर आली आहे. ज्या पेट्रोल पंपांवर इंधनाचा मर्यादित पुरवठा झाला आहे, तेथे वितरण सुरू असले तरी वाहनांच्या प्रचंड गर्दीमुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवणे प्रशासनासाठी आव्हानात्मक ठरत आहे. या सर्व घडामोडींमुळे खेड तालुक्यातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असून, प्रशासनाने तातडीने इंधन पुरवठा सुरळीत करण्यासाठी पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg