loader
Breaking News
Breaking News
Foto

नशा मुक्त भारत अभियानामध्ये खेडचे डॉक्टर विश्वेश चिखले यांचा सत्कार

खेड - संपूर्ण भारतभर चाललेल्या नशा मुक्ती भारत अभियानाच्या सांगता समारंभात खेडचे डॉक्टर श्री विश्वेश चिखले यांचा राजापूर नगरीचे माजी आमदार हुस्नबानू खलीपे व डॉक्टर सचिन परब यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व ताम्रपत्र देऊन सत्कार करण्यात आला. डॉक्टर विश्वेश चिखले यांनी अविरत पंधरा दिवस या अभियानाचा एक भाग म्हणून कार्य केले. या अभियानातील रथामध्ये कुंभकरण जागृतीचा चलचित्र देखावा सादर करण्यात आला, तसेच नशा केल्याने होणारे दुष्परिणाम एलईडी प्रोजेक्टर च्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्यात आले. या रथाला हाताळण्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत लोकांमध्ये नशा मुक्ती साठी जागृती आणण्याचे कार्य त्यांनी केले. तसेच वेगवेगळ्या शाळा कॉलेजमधून नशा मुक्तीसाठी आपले प्रभावी वक्तव्य सादर करून अनेकांची मने जिंकली, व अनेकांना व्यसन सोडण्यासाठी प्रवृत्त केले. या त्यांच्या बहु कार्यामुळे ते विशेष चर्चेत आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg