loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर तालुक्यातील आदर्श अंगणवाडी सेविका व मदतनीस पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

वरवेली (गणेश किर्वे) - जिल्हा परिषदेमार्फत दरवर्षीप्रमाणे अंगणवाडी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सेविका व मदतनीस यांचा गौरव करण्यासाठी “आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका पुरस्कार” वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सन २०२५/२६ या वर्षासाठी सन २०२४/२५ मधील कार्याचा आढावा घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदरचा कार्यक्रम कै. इंदिरा वासुदेव शेटे सभागृह, (भंडारी भवन), किर्तनवाडी रोड, गुहागर येथे पार पडला. या प्रसंगी विविध अंगणवाडी केंद्रांतील सेविका व मदतनीस यांना त्यांच्या कार्यगौरवासाठी सन्मानित करण्यात आले. बीट हेदवी एक मधील नरवण पंधरवणे अंगणवाडीतील अंगणवाडी सेविका रिया राजेंद्र राऊत व मदतनीस पूर्वा विकास नाटुस्कर यांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जानवळे कोंडविलकरवाडी अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका अनुष्का सचिन चिपळूणकर व मदतनीस ऋतिका विजय कोंडविलकर यांना द्वितीय क्रमांक, तर हेदवी दोन बीटमधील अंगणवाडी सेविका स्वाती शिवनाथ झिबर व मदतनीस शुभांगी शशिकांत वायंगणकर यांना तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पुरस्कारप्राप्त सेविका व मदतनीस यांचे सन्मानचिन्ह देऊन अभिनंदन करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य अपूर्वा बारगोडे, पंचायत समिती सदस्य स्नेहा शिगवण, सारिका दाभोळकर, ऊर्वी खैर यांनी उपस्थित राहून पुरस्कारप्राप्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. गुहागर पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनीही आदर्श पुरस्कार प्राप्त सेविका व मदतनीस यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच मुख्य सेविका यांनी सुद्धा पुरस्कारप्राप्त सेविका व मदतनीस यांच्या कामकाजाबद्दल गौरवोद्गार काढून सर्वांनी अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी शुभेच्छा व मार्गदर्शन केले.

टाईम्स स्पेशल

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कार्याचा गौरव करताना बालकांच्या संगोपन, पोषण व प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे अधोरेखित करण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व सेविका व मदतनीस यांचा गौरव करण्यात आला. तसेच अशा प्रकारचे प्रोत्साहनपर उपक्रम राबवल्याबद्दल जिल्हा परिषदेचे आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी अंगणवाडी सेविका संघटनांचे पदाधिकारी, अध्यक्ष, सचिव व मोठ्या संख्येने सेविका उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिंदे यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg