loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबईत ‘कोंढे चषक २०२६ - पर्व पहिले’ उत्साहात संपन्न

खेड (दिलीप देवळेकर)-दापोली तालुक्यातील कोंढे बौद्धजन विकास मंडळ, मुंबई यांच्या वतीने आयोजित ‘कोंढे चषक २०२६ - पर्व पहिले’ ही भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा मुंबईतील कळवा येथील पटणी मैदानावर उत्साहात पार पडली. “वाडी ते वाडी, गाव ते गाव” या संकल्पनेतून आयोजित या स्पर्धेत तब्बल १६ संघांनी सहभाग घेत स्पर्धेला चांगलीच रंगत आणली. अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात खेड तालुक्यातील निलचक्र होडखड संघाने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले, तर कालकाई कृपा खेड-तिसे संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. विजेत्या संघाला २१ हजार रुपये व आकर्षक चषक, तर उपविजेत्या संघाला ११ हजार रुपये व चषक प्रदान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्पर्धेदरम्यान प्रत्येक सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरविण्यात आले. याशिवाय ‘बेस्ट बॅट्समन’, ‘बेस्ट बॉलर’ आणि ‘मॅन ऑफ द सिरीज’ असे विशेष सन्मानही प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अशरफ शानू पठाण तसेच लोकनायक कुंदन गोटे प्रतिष्ठानचे संस्थापक बुद्धभूषण कुंदन गोटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी कोंढे बौद्धजन विकास मंडळासोबत श्रावस्ती महिला मंडळ, कोंढे बौद्धजन सेवा संघ शाखा क्र. २३ अ, माता रमाई मंडळ आणि भीमज्योत नवतरुण मित्र मंडळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg