कणकवली (प्रतिनिधी) - कणकवली शहरातील मुडेडोंगरी परिसरातील न.पं.च्या पाण्याच्या टाकीकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ मोहन मळा नजिक पायवाटेवर शुक्रवारी पहाटे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुशांत जनार्दन दळवी (वय 40) यांचा गोळी घालून खून झालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. सुशांत दळवी हे मूळ कळसुली गावसेवाडी येथील रहिवासी असून सध्या कणकवलीत स्थायिक होते. प्राथमिक माहितीनुसार, मध्यरात्रीनंतर अज्ञात इसमांनी पिस्तुलाच्या सहाय्याने त्यांच्या डोक्याच्या मध्यभागी गोळी झाडून खून केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. गोळी झाडल्यानंतर मृतदेह काही अंतर ओढत नेऊन पायवाटेवर टाकण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी रक्ताचे डाग आढळून आले असून दळवी यांच्या डोक्यावर गोळी लागल्याच्या स्पष्ट खुणा दिसून येत होत्या.
दरम्यान, शुक्रवारी पहाटे सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास मोहन मळा परिसरातील शेतघरात राहणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या कामगाराला प्रातःविधीसाठी जात असताना हा मृतदेह दिसून आला. त्याने तातडीने आपल्या मालकाला याची माहिती दिली. त्यानंतर मालकाने कणकवली पोलिस ठाण्यात जाऊन घटनेची खबर दिली. माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मोहन दहीकर, डॉ.अप्पर पोलिस अधीक्षक नयोमी साटम, कणकवली पोलिस निरीक्षक तेजस नलावडे, उपनिरीक्षक पवन कांबळे, अनिल हाडळ, वृषाली बरगे तसेच कॉन्स्टेबल पांडुरंग कलंतरे, सागर जाधव, मिलिंद देसाई, महेश शेडगे यांच्यासह पोलिसांची मोठी टीम घटनास्थळी दाखल झाली. तसेच फॉरेन्सिक तज्ञांनाही पाचारण करण्यात आले श्वान पथकाच्या माध्यमातून तपास सुरू करण्यात आला होता.
या घटनेची वार्ता समजताच परिसरातील नागरिक, बांधकाम व्यावसायिक तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. या खुनामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून हा घातपात असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी परिसराची पाहणी करून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.





















































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)
































































































































































































































































































































.jpg)

















53.jpg)






3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.