loader
Breaking News
Breaking News
Foto

रेशन कार्ड धारकांना मिळणार 3 लिटर रॉकेल

मुंबई - आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. संभाव्य LPG टंचाईच्या पार्श्वभूमीवर शिधापत्रिकाधारकांना दरमहा 3 लिटर केरोसीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे स्वयंपाकासाठी गॅसवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः ग्रामीण भाग आणि कमी उत्पन्न गटातील नागरिकांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याशिवाय, ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही अशा कुटुंबांनाही केरोसीन उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी स्थानिक प्रशासन आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे विशेष यंत्रणा उभी केली जाणार आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे LPG सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत होऊ नये यासाठी पर्यायी उपाय म्हणून केरोसीन वाटपाचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, नागरिकांनी घाबरून साठेबाजी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पुरेसा साठा उपलब्ध असून नियोजनबद्ध पद्धतीने वितरण केले जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg