loader
Breaking News
Breaking News
Foto

बांदा येथे श्रीरामनवमी उत्साहात साजरी

बांदा (प्रतिनिधी) - बांदा येथे श्रीरामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. बांद्यातील श्री विठ्ठल मंदिर, श्री बांदेश्वर मंदिर, श्री साईबाबा मठ, संत सोहिरोबानाथ आंबिये स्मारक मंदिर तसेच श्रीराम पंचायतन मंदिर, पानवळ येथे हा सोहळा साजरा करण्यात आला. बांदा श्री विठ्ठल मंदिरात दुपारी ठिक १२ वाजता रामनामाच्या जयघोषात प्रभु श्रीरामाला पाळण्यात घालून झोके देण्यात आले. सर्व भाविकांनी पुष्पवृष्टी केली. त्यानंतर ढोलताशांच्या गजरात पालखी फेरी निघाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

श्री बांदेश्वर मंदिरामध्येही याच वेळेत भाविकांच्या उपस्थितीत रामन्मसोहळा होऊन श्रींची सवाद्य पालखी फेरी निघाली. मार्गात दोन्ही पालख्यांच्या वार्षिक भेटीचा सोहळा झाला. गावातील देवतांना भेट देऊन दोन्ही पालख्या मंदिरात परतल्या. बांदा येथिल श्री साईमठ, संत सोहिरोबानाथ आंबिये स्मारक मंदिर तसेच पानवळ येथिल श्रीराम पंचायतन मंदिर येथेही श्रीरामनवमी निमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg