loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड- आवाशीत गांजासह दुचाकी जप्त, एक ताब्यात

खेड : तालुक्यातील आवाशी-माळवाडी येथे विक्रीसाठी गांजा नेणाऱ्या एकास येथील पोलिसांनी ८५०० रुपये किमतीच्या गांजा व दुचाकीसह रंगेहाथ पकडले. शैलेश राजेश जाधव (१८, कासेगाव - सांगली) असे संशयिताचे नाव आहे. हा गांजा त्याने नेमका कुठून आणला, याचा पोलिसांकडून कसून शोध घेण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संशयित हा दुचाकीवरून गांजा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आवाशी- माळवाडी येथे सापळा रचला. या सापळ्यात संशयित पोलिसांच्या तावडीत सापडला. त्याच्याकडून ५४१ ग्रॅम वजनाचा गांजा पोलिसांनी हस्तगत केला. गांजा विक्रीसाठी वापरलेली जुनी वापरती दुचाकीही पोलिसांनी ताब्यात् घेतली. संशयित हा गांजा नेमका कोणाला विक्री करणार होता, याचा पोलिसांकडून सखोल तपास करण्यात येत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg