loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाण्यात घोडबंदर रोड येथे दुचाकीस्वाराच्या धडकेत महिलेचा मृत्यू

ठाणे (प्रतिनिधी) - देवी दर्शनासाठी निघालेल्या महिलेचा दुचाकीस्वाराच्या धडकेत घोडबंदर येथील मानपाडा भागात मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी महिलेच्या मुलाने दिलेल्या तक्रारीनुसार अद्यात दुचाकीस्वाराविरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ठाण्यात घोडबंदर येथील डोंगरीपाडा भागात नीलम सिंह (५४) असे मृत महिलेचे नाव आहे. नीलम सिंह या त्यांचे पती, दोन मुले आणि मुलीसह वास्तव्यास आहेत. नीलम यांचे पती आणि थोरला मुलगा रिक्षा चालक असून त्यांच्या उत्पन्नातून कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सोमवारी सकाळी नीलम सिंह या त्यांची बहिण आणि शेजारी राहणाऱ्या महिलेसोबत घोडबंदर भागातील देवी दर्शनासाठी निघाल्या होत्या. त्यांनी पातलीपाडा येथील एका मंदिरात देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्या कापूरबावडी भागातील एका मंदिरात जाण्यास निघाल्या. दुपारी १२ वाजताच्या सुमारास मानपाडा परिसरातून रस्ता ओलांडत असताना एका भरधाव दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. या अपघातात नीलम सिंह यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली.

टाईम्स स्पेशल

घटनेची माहिती नीलम यांच्या बहिणीने त्यांच्या कुटुंबियांना दिल्यानंतर त्यांनी तात्काळ नीलम यांना मानपाडा परिसरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मंगळवारी सायंकाळी उपचारा दरम्यान डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघाप्रकरणी नीलम यांच्या मुलाने कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे बुधवारी अज्ञात दुचाकीस्वारा विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg