मालवण (प्रतिनिधी) - मालवण तालुका उबाठा शिवसेनेच्या वतीने मालवणात माजी आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. बहुसंख्य शिवसैनिकांच्या उपस्थितीत माजी आमदार वैभव नाईक यांनी केक कापत वाढदिवस साजरा केला. यावेळी तालुकाभरातील ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी वैभव नाईक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. तर यानिमित्त सादर झालेले नेरूर येथील पारंपारिक रोंबाट सर्वांचे आकर्षण ठरले. मालवण भरड येथील नगरपालिकेच्या वाहनतळावर आयोजित या वाढदिवस अभिष्टचिंतन कार्यक्रमात शिवसैनिकांतर्फे भव्य पुष्पहार घालून माजी आमदार वैभव नाईक यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सौ स्नेहा नाईक ठाकरे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, तपस्वी मयेकर तसेच महिला आघाडीच्या दिपा शिंदे, नगरसेविका अनिता गिरकर, माजी नगरसेविका पूजा करलकर, युवतीसेना जिल्हाप्रमुख निनाक्षी मेतर आदी व इतर उपस्थित होते. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मनोगते व्यक्त करत वैभव नाईक यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी वैभव नाईक म्हणाले, माझा पराभव झाला तरी मी दुसऱ्या दिवसापासून काम करण्यास सुरुवात केली. आमदारकीच्या काळात मी जे काही काम केले ते जनतेसमोर आहे. पराभवानंतर माझ्यासह कार्यकर्त्यांना अनेक आमिषे आली, दबाव टाकण्यात आला. मात्र सर्व कार्यकर्ते माझ्यासोबत येथेच आहेत. जे कोणी पक्ष सोडून गेले ते स्वार्थापोटी गेले. मी नेहमी दबाव झुगारून काम केले. मालवणात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यावर दबाव झुगारत आम्ही आंदोलन केले, भ्रष्टाचार समोर आणला. म्हणून आज शिवरायांचा नवीन भक्कम असा पुतळा उभा राहिला. दबावाच्या विरोधाची किंमतही चुकवावी लागते, ती विधानसभेच्या निवडणुकीतील पराभवाने चुकवावी लागली. मात्र दबावासमोर आम्ही झुकलो नाही. आताचे मालवणचे आमदार हे विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पैशावर निवडून आले आणि नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या पैशाच्या विरोधात गेले, मात्र निवडणुकीनंतर त्यांनी आपली तलवार म्यान करत भाजप प्रदेशाध्यक्षांच्या मांडीला मांडी लावून बसले. मला कोणासमोर लाचार व्हायचे नाही, मी कोणाच्या आमिषाला बळी पडू नये, माझा स्वाभिमान दुखावता नये एवढीच माझी प्रार्थना आहे, आणि यासाठी आवश्यक शक्ती जनतेने व कार्यकर्त्यांनी मला द्यावी, असेही यावेळी वैभव नाईक यांनी सांगत शुभेच्छांबद्दल आभार मानले. यावेळी सादर झालेल्या नेरूर येथील रोंबाट कार्यक्रमांस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी मालवण तालुक्यातील ठाकरे शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच आंबा व्यावसायिक यांनी वैभव नाईक यांना शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन गणेश सातार्डेकर व रोहन कदम यांनी केले.




















































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)
































































































































































































































































































































.jpg)

















58.jpg)






3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.