loader
Breaking News
Breaking News
Foto

नाम. योगेशदादा कदम यांचा गिम्हवणे दुबळेवाडीत जाहीर सत्कार

दापोली (प्रतिनिधी) - श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे गृह (शहरे) महसूल, ग्रामविकास व पंचायती राज, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषधी प्रशासन राज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी गिम्हवणे दुबळेवाडी येथील श्रीराम मंदिरात उपस्थित राहून श्री प्रभू रामचंद्रांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी श्रीराम मंडळ गिम्हवणे दुबळेवाडी मुंबई ट्रस्ट आणि प्रगती महिला मंडळ गिम्हवणे दुबळे वाडीच्यावतीने नाम. योगेशदादा कदम यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन जाहीर सत्कार केला. हा सत्कार गिम्हवणे दुबळेवाडी मंडळाचे अध्यक्ष सुरेश खळे आणि पंचायत समिती सदस्या सुवर्णा खळे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोली तालुक्यातील गिम्हवणे दुबळेवाडी येथे नाम. योगेशदादा कदम यांनी विविध प्रकारची सार्वजनिक हिताची विकास कामे पूर्ण केली आहेत नाम. योगेशदादा कदम यांचे गिम्हवणे दुबळेवाडीसाठी कायमच सहकार्याच्या मदतीचा हात पुढे असतो. या कृतार्थ भावनेने गिम्हवणे दुबळेवाडी येथील श्रीराम मंडळाने श्रीराम जन्मोत्सव सोहळा कार्यक्रमानिमित्त आवर्जून उपस्थित राहिलेल्या नाम.योगेशदादा यांनी यथोचित सन्मान केला. तसेच ही अनमोल संधी साधत गिम्हवणे ग्राम पंचायतीचे सरपंच पद भुषविलेल्या आणि गिम्हवणे दुबळे वाडीच्या रहीवाशी तसेच दापोली पंचायत समितीच्या सदस्या सुवर्णा खळे यांचाही नाम. योगेशदादा कदम यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

यावेळी दापोली विधानसभा क्षेत्रस्तरिय मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना शासकीय समितीचे अध्यक्ष किशोर देसाईं, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे निवृत्त कुलसचिव सुभाष चव्हाण, सभापती उन्मेष राजे, जिल्हा परिषद सदस्या ऐश्वर्या धाडवे, पंचायत समिती सदस्या खळे, माजी समाज कल्याण समिती सभापती भगवान घाडगे, गिम्हवणे दुबळेवाडी श्रीराम मंडळ मुंबई ट्रस्टचे अध्यक्ष सुरेशभाई भुवड, शैलेश खळे, संजय जाधव, नारायण दुबळे, चंद्रकांत जाधव, विभाग प्रमुख मोहन शिगवण, माजी सभापती प्रकाश कालेकर, कोकण कृषी विद्यापीठ कार्यकारी समितीचे सदस्य सुनील दळवी, किर्तनकार कर्वे बुवा आदिंसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg