loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर रायगड कबड्डी संघाच्या सराव शिबिराला उत्साहात प्रारंभ

पनवेल (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या तयारीसाठी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पुरुष व महिला कबड्डी संघाच्या सराव शिबिराला पनवेल येथे उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली आहे. दि. २६ मार्चपासून सुरू झालेले हे शिबीर दि. ३१ मार्च पर्यंत खांदा कॉलनी येथील सिकेटी महाविद्यालयाच्या मैदानावर होत आहे. दिनांक २ एप्रिल ते ६ एप्रिल २०२६ दरम्यान सिन्नर (जि. नाशिक) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेसाठी रायगड जिल्हा संघाची सक्षम तयारी व्हावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांच्या हस्ते करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून छत्रपती पुरस्कार विजेते सूर्यकांत ठाकूर, संघ व्यवस्थापक प्रमोद म्हात्रे, सचिन पाटील, मंदार मुंबईकर, जितू मेमी, पदाधिकारी, प्रशिक्षक व कबड्डीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सराव शिबिरामध्ये पुरुष संघातील १४ खेळाडू व २ प्रशिक्षक तसेच महिला संघातील १४ खेळाडू व २ प्रशिक्षक अशा एकूण ३२ जणांचा सहभाग असून सर्व खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण दिले जात आहे. खेळाडूंना तांत्रिक, शारीरिक व मानसिक पातळीवर सक्षम बनविण्यावर विशेष भर दिला जात आहे. शिबिरातील खेळाडूंसाठी निवास, भोजन व इतर आवश्यक सुविधांची उत्तम व नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक खेळाडूस संपूर्ण स्पोर्ट्स किट्स रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने प्रदान करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

या शिबिरातून तयार होणारा रायगड जिल्हा कबड्डी संघ राज्यस्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. सदर सराव शिबीर दररोज सकाळी ६ ते सकाळी ९ वाजेपर्यंत तसेच सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत, क्रीडांगणावर होत असून दिनांक १ एप्रिल २०२६ रोजी पुरुष व महिला कबड्डी संघ महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड स्पर्धेसाठी सिन्नर, नाशिक येथे रवाना होणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg