loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीचे माजी पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची अतिरिक्त पोलिस आयुक्तपदी बढती

राजापूर (तुषार पाचलकर) - रत्नागिरीचे भूतपूर्व पोलिस अधीक्षक तथा महाराष्ट्र पोलिस दलातील अनुभवी आयपीएस अधिकारी धनंजय कुलकर्णी यांची मुंबई पोलिस दलाच्या पूर्व प्रादेशिक विभागाच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तपदी बढती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. धनंजय कुलकर्णी यांनी कृषी शाखेतील पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९९८ मध्ये पोलिस उपअधीक्षक म्हणून आपल्या सेवेला सुरुवात केली. सध्या ते मुंबई विशेष शाखेत अप्पर पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत होते. सेवेच्या काळात त्यांनी मुंबईतील विविध महत्त्वाच्या पदांवर काम करताना दहशतवादविरोधी पथकात उल्लेखनीय योगदान दिले. तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली होती. याशिवाय संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सेनेत तसेच इंटरपोलमध्येही त्यांनी उल्लेखनीय सेवा दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नक्षलग्रस्त भागातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना विशेष सेवा पदक आणि राष्ट्रपती पोलिस पदकाने गौरविण्यात आले आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभव, शांत स्वभाव आणि प्रभावी नेतृत्वामुळे त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. खाकी वर्दीतील प्रामाणिक, संवेदनशील आणि जमिनीवर राहून काम करणारे अधिकारी म्हणून धनंजय कुलकर्णी यांची ओळख आहे. समाजभान जपत सर्वसामान्यांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवणारे अधिकारी म्हणूनही ते परिचित आहेत. त्यांच्या बढतीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg