खेड - दापोली खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना शेती अवजारांसाठी आवश्यक असणारे पेट्रोल व डिझेल सहज उपलब्ध व्हावे, यासाठी दापोली तहसीलदार कार्यालयाकडून तालुक्यातील पेट्रोल पंप चालकांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबतचे अधिकृत पत्र जारी करण्यात आले आहे. दापोली पंचायत समितीचे सभापती उन्मेष राजे यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना पेट्रोल पंपांवर कॅनमध्ये पेट्रोल व डिझेल देण्यास नकार दिला जात असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर महसूल विभागाने तातडीने दखल घेत संबंधित पेट्रोल पंप चालकांना आदेश जारी केले आहेत.
सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू असून शेतकरी ट्रॅक्टर, पॉवर टिलर, डिझेल इंजिन, गवत कापणी यंत्र यांसारख्या विविध यांत्रिक अवजारांचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. ही यंत्रणा चालविण्यासाठी पेट्रोल व डिझेल अत्यावश्यक असल्याने शेतकऱ्यांना इंधन पुरवठा सुरळीत होणे गरजेचे आहे. मात्र काही पेट्रोल पंपांकडून शेतकऱ्यांना कॅनमध्ये किंवा पिंपामध्ये पेट्रोल व डिझेल देण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
त्यामुळे शेतीची कामे खोळंबण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेऊन तहसील प्रशासनाने पेट्रोलियम कायदा १९३४ व पेट्रोलियम नियम २००२ मधील तरतुदीनुसार संबंधित पंप चालकांना शेतकऱ्यांना कॅनमध्ये इंधन उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. या आदेशामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून खरीप हंगामातील शेतीकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या या निर्णयाचे शेतकरी वर्गातून स्वागत करण्यात येत आहे.










































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.