loader
Breaking News
Breaking News
Foto

मंडणगड मधील असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

खेड (प्रतिनिधी) - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “विकसित भारत” या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेवर, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या “विकसनशील महाराष्ट्र” या ध्येयावर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या कुशल संघटन कौशल्यावर विश्वास ठेवून भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांच्या उपस्थिती मध्ये मंडणगड येथील फरमान पुणेकर, मतीन टेमकर, फराज चिमावकर, इरफान करविणकर, सऊद पेडेकर, बशारत करविणकर, मैनुद्दीन ख्वाजा यांनी भाजपात प्रवेश केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रसंगी खेड नगर परिषदेच्या विद्यमान नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, महेश कचावडे, भाजपा मंडणगड अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष असफान खलफे, सुयश उर्फ बॉबी खेडेकर, भाजपा सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, प्रथमेश सुर्वे, विजय गुप्ता, प्रणव मापुस्कर, स्वराज गांधी, प्रदीप भोसले उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg