loader
Breaking News
Breaking News
Foto

बँक कर्मचाऱ्याच्या बेपत्ता प्रकरणाने चिपळूण हादरले, चार पानी पत्रामुळे प्रकरण गूढ

चिपळूण : शहरातील एका बँकेच्या शाखेत कार्यरत असलेला ३३ वर्षीय युवक अचानक बेपत्ता झाल्याने चिपळूण तालुक्यात खळबळ उडाली आहे. मुकुंद मुरलीधर पालांडे असे बेपत्ता युवकाचे नाव असून ते अलोरे गावचे रहिवासी आहेत. या प्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुकुंद पालांडे हे काल दुपारी सुमारे 3 वाजल्यापासून संपर्काबाहेर आहेत. बेपत्ता होण्यापूर्वी त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात चिपळूण पोलीस निरीक्षकांना उद्देशून चार पानी पत्र लिहिल्याची माहिती समोर आली आहे. या पत्रात त्यांनी संबंधित बँकेच्या चिपळूण शाखेतील चार जणांची नावे नमूद करत त्यांना आपल्या आत्महत्येस जबाबदार धरल्याचे सांगितले जात आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी चिपळूण येथील विरेश्वर तलाव परिसरात काही तरुणांनी आपल्याला मारहाण केल्याचा उल्लेखही त्यांनी पत्रात केला असल्याची माहिती मिळत आहे. हे प्रकरण ओळखीच्या पोलिसांच्या मध्यस्थीने मिटविण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केल्याचे सांगितले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच शिरगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक भरत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम हाती घेतली. काल रात्री उशिरापर्यंत कोळकेवाडी कॅनॉल परिसरात शोधकार्य सुरू होते. यावेळी संबंधित युवकाची दुचाकी संशयास्पद अवस्थेत आढळून आली. आज सकाळपासून चिपळूणहून बोट मागवून कॅनॉल परिसरात अधिक व्यापक शोधमोहीम राबविण्यात येत आहे. या घटनेमुळे पालांडे कुटुंबीयांवर मोठा मानसिक आघात झाला असून परिसरातही चिंतेचे वातावरण पसरले आहे. पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून बेपत्ता युवकाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg