खेड - दापोली तालुक्यातील गव्हे ब्राह्मणवाडी येथील संकेत हरिश्चंद्र पवार (वय ३४) या तरुणाचा वीजेच्या पोलवर काम करत असताना विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे गव्हे गावावर शोककळा पसरली असून पवार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेच्या वेळी ते मुरुड परिसरात काम करत होते.
संकेत पवार हे गेली अनेक वर्षे वीज वितरण कंपनीच्या खाजगी ठेकेदाराकडे काम करत होते. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते आपल्या सहकाऱ्यांसोबत मुरुड परिसरात कामासाठी गेले होते. वीजेच्या पोलवर चढून काम सुरू असताना अचानक त्यांना विजेचा जोरदार शॉक लागला. यात ते गंभीर जखमी झाले. सहकाऱ्यांनी तातडीने मदतीचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.










































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.