loader
Breaking News
Breaking News
Foto

सदानंद चव्हाण यांनाच उमेदवारी द्या, शिवसैनिकांचा एकमुखी ठराव

चिपळूण : आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील उमेदवारीवरून राजकीय हालचालींना वेग आला असताना, चिपळूण तालुक्यातील शिवसैनिकांनी माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या उमेदवारीसाठी जोरदार मागणी केली आहे. चिपळूण येथे पार पडलेल्या शिवसेना तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत यासंदर्भात एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. “कोकण हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला असून ही जागा शिवसेनेचीच आहे. त्यामुळे या मतदारसंघातून शिवसेनेकडून माजी आमदार सदानंद चव्हाण यांनाच उमेदवारी मिळावी,” अशी ठाम भूमिका कार्यकर्त्यांनी बैठकीत मांडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राज्यात महायुतीची सत्ता असल्याने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या मतदारसंघाची उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे संघटनात्मक वर्चस्व आणि स्थानिक पातळीवरील मजबूत पकड लक्षात घेता, या जागेवर शिवसेनेचा दावा अधिक भक्कम मानला जात आहे. याच पार्श्वभूमीवर चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार सदानंद चव्हाण यांना पक्षाने संधी द्यावी, अशी आग्रही मागणी तालुक्यातील शिवसैनिकांकडून करण्यात आली. काही दिवसांपूर्वी चिपळूण येथे झालेल्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी “सदानंद चव्हाण यांना लवकरच मोठी जबाबदारी दिली जाईल,” असे वक्तव्य केले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या अपेक्षांना अधिक बळ मिळाले आहे.

टाईम्स स्पेशल

तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेला ठराव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे मांडण्यात येणार असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे ही मागणी अधिकृतपणे पोहोचविण्याचे निश्चित करण्यात आले. या बैठकीस तालुकाप्रमुख तथा उपसभापती संदेश बापू आयरे, तालुकाप्रमुख रुपेश घाग, शहरप्रमुख तथा नगराध्यक्ष उमेश सकपाळ, पंचायत समिती सदस्य विनोद झगडे, बाळशेठ जाधव, कपिल शिर्के, निहार कोवळे, राकेश शिंदे, अंकुश आवले, हर्षाली पवार, राणी महाडिक, उदय जुवळे, प्रमोद बुरटे, विकी लवेकर, गणेश आग्रे, नीलम जाधव, परिमल भोसले, सुयोग चव्हाण, दयानंद जुवळे, प्राजक्ता टकले, अवधूत शिर्के, विनोद पिल्ले, सिद्धार्थ कदम, दीपक वारोसे, अमित खातू, फैसल मेमन यांच्यासह शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg