रत्नागिरी : कोकणची शान आणि फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्यासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा जगभरात ओळखला जातो. दरवर्षी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कोकणातील हापूसची पहिली पेटी बाजारात दाखल होते आणि खऱ्या अर्थाने आंबा हंगामाला सुरुवात होते. मात्र, यावर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका आंबा बागायतदारांना बसला असून, गुढीपाडव्याचा तो पारंपारिक उत्साह काहीसा मावळल्याचे चित्र दिसत आहे. रत्नागिरीसह संपूर्ण कोकण पट्ट्यात यावर्षी आंब्याचे उत्पादन कमालीचे घटल्याने सर्वसामान्य ग्राहकांसाठी हापूस यंदा 'महागडा' ठरणार आहे. यंदाच्या हंगामात बदलत्या वातावरणाने आंबा पिकाचे मोठे नुकसान केले आहे. कडाक्याची थंडी आणि त्यानंतर अचानक वाढलेल्या उष्म्यामुळे आंब्याला आलेला सुमारे ९० टक्के मोहर झाडावरच करपून गेला.
परिणामी, दरवर्षीप्रमाणे मुबलक प्रमाणात आंबा तयार होऊ शकला नाही. या संकटाचा सर्वाधिक परिणाम उत्पादनावर झाला असून, सुमारे ७० टक्के बागायतदारांना यंदा गुढीपाडव्याचा मुहूर्त साधता आलेला नाही. केवळ मोजक्याच बागायतदारांकडे थोड्या प्रमाणात आंबा तयार असल्याने बाजारात अत्यंत मर्यादित आवक पाहायला मिळत आहे. वाशी येथील घाऊक बाजारपेठेत दरवर्षी या काळात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर भागातून ५० हजारहून अधिक आंब्याच्या पेट्यांची आवक होते. मात्र, यंदा ही संख्या अवघ्या १० ते १५ हजार पेट्यांवर येऊन ठेपली आहे. आवक कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे बाजारपेठेत हापूसचे दर गगनाला भिडले आहेत. सध्या हापूसच्या एका पेटीला ५ ते ७ हजार रुपयांपर्यंत भाव मिळत असून, किरकोळ बाजारात एक डझन आंब्यासाठी ग्राहकांना १५०० ते २००० रुपये मोजावे लागत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर अद्याप म्हणावी तशी आवकही सुरू झालेली नाही. आंबा उत्पादनात झालेली ही मोठी घट पाहता, यंदा संपूर्ण हंगामात आंब्याचे दर चढेच राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, एप्रिल महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात आंब्याचा दुसरा बहर तयार होईल, असा अंदाज बागायतदारांनी व्यक्त केला आहे. तेव्हा आवक थोडी वाढण्याची शक्यता असली, तरी निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा बागायतदारांच्या हातातून मोठी संधी निसटली आहे, हे मात्र नक्की.






















































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)
































































































































































































































































































































.jpg)

















59.jpg)






3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.