खेड : मीडियावर कॉक्रोज जनता पार्टी या नावाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या नावाचे पोस्ट, व्हिडिओ आणि मीम्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून विशेषतः तरुणांमध्ये या नव्या संकल्पनेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आपली प्रतिक्रिया देताना सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्ष उभा करणे तेवढे सोपे नसल्याचे स्पष्ट केले. राजकारणात सातत्याने काम, मजबूत संघटन आणि जनतेशी थेट संपर्क आवश्यक असतो, असे त्यांनी सांगितले.
योगेश कदम म्हणाले, सोशल मीडियाच्या माध्यमातून भूमिका मांडता येतात, तरुणांना एका व्यासपीठाखाली एकत्र आणता येते. मात्र फक्त सोशल मीडियाच्या जोरावर पक्ष चालवणे इतके सोपे नसते. कोणत्या हेतूने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे, हे पुढील काळात स्पष्ट होईल. मात्र देशातील आणि राज्यातील तरुण मोठ्या प्रमाणात एकत्र येत असतील, चर्चा करत असतील तर ती लोकशाहीसाठी सकारात्मक बाब आहे. यावेळी त्यांनी कॉकरोज जनता पार्टी या संकल्पनेमागे काम करणाऱ्या संस्थापकाचे अभिनंदनही केले. भारत हा तरुणांचा देश आहे आणि महाराष्ट्र हे तरुणांचे राज्य आहे.
तरुणांचे विचार ऐकून घेतले गेले पाहिजेत. मी स्वतः तरुण मंत्री असून तरुणांच्या अपेक्षा आणि प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणावर बोलताना योगेश कदम यांनी राज्य सरकार या प्रकरणात अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले. तरुणांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही. या प्रकरणातील दोषींवर शंभर टक्के कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.